
‘नो वाइन, नो बीअर, हॅप्पी न्यू इयर’
गोंदिया,दि.31-महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व एम. जी. पॅरामेडीकल काॅलेज गोंदिया माध्यमातून ’चला व्यसन बदनाम करूया’ ही व्यसन विरोधी मोहीम चालवली जात आहे.पोलिस निरिक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत ‘द-दारूचा नव्हे, द दुधाचा’ हा कार्यक्रम येथील एम. जी. पॅरामेडीकल काॅलेज परिसरात आयोजित करण्यात आला. नववर्षाच्या स्वागता दरम्यान तरूणाईत प्रचंड उत्साह असतो. मात्र काही तरूण दारू प्राशन करून धिंगाना घालतात. यामुळे वाद विवाद होऊन गावातील व परिसरातील वातावरण कलुषित होते. तर दारू प्राशन करून वाहन चालविल्याने बÚयाचदा अपघात होतात. त्यामुळे अशा घटना घडू नये, या कार्यक्रमात नागरिकांना दारूमुळे उदभवनारे दुष्परिणाम सांगून दारू ऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन सिटी पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले. तसेच रैलीला हिरवी झंडी दाखवून कार्यक्रमाची शुरूवात करण्यात आली. ‘द-दारूचा नव्हे, द दुधाचा’ नो वाईन, नो बिअर, हॅप्पी न्यू इयर असी घोषणा रैलीमध्ये यावेळी करण्यात आले.या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन एम. जी. पॅरामेडीकल काॅलेजचे संचालक अनिल गोंडाणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांना दुधाचे मोफत वाटप देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस विभागाचे श्री गणविर, निरंजन भगत, विनोद बंसोड व शिव नागपूरे उपस्थित होते.
या मोहिमेंतर्गत समाजसेविका सविताताई बेदरकर यांनी सांगीतले की कोणत्याही अंमली पदार्थाचे व्यसन हे वाईटच असते. अलीकडे तरूण पिढी दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करीत आहे. या दरम्यान यांनी विद्याथ्र्यांना शपथ दिली व दारूच्या प्रतिकात्मक राक्षसाला चप्पल मारली व त्याचे दहन करून कार्यक्रमाचा समापन करण्यात आला.
या कार्यक्रमात काॅलेजचे श्रीमती मनसरबाई गोंडाने, प्राचार्य श्रीमती अनुसया लिल्हारे, प्रा. प्रिती वैद्य, प्रा. ललित डबले, प्रा. छाया राणा, प्रा. रामेश्वरी पटले, प्रा. आरती चैधरी, प्रा. मनीष चैधरी, प्रा. लोकेश बनोठे, राजू रहांगडाले, सौरभ बघेले,राजाभाऊ उंदिरवाडे,योगेश्वरी ठवरे व रूपाली धमगाये यांचा उपस्थित पार पडला. तसेच या प्रसंगी एम.जी. पॅरामेडिकल काॅलेजचे विद्यार्थी स्वयंशासन कार्यक्रमात सहभागी झाले व इतर विद्याथ्र्यांनी कार्यक्रम उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमाचे संचालन माधवी पटले यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. ललित डबले यांनी केले.