33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News तलाठी भरती पदाची गुणवत्ता यादी जाहीर; 4 हजार 644 पदांसाठी भरती

तलाठी भरती पदाची गुणवत्ता यादी जाहीर; 4 हजार 644 पदांसाठी भरती

0
161

blank

पुणे : राज्य शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या भरती परीक्षेतील उमेदवारांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. त्यानुसार लवकरच निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पुढील तीन आठवड्यांत यशस्वी उमेदवारांची यादी भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.

परीक्षा क्रमांकानुसार यादी

  • उमेदवारांची जास्त संख्या असल्याने गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी मोठा काळ लागल्याचे नरके यांनी सांगितले. गुणवत्ता यादी तयार करताना एका सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली आहे.
  • प्रत्येक क्षेत्रातील शंभर प्रश्नांपैकी काठिण्य पातळीनुसार हे गुण देण्यात आले आहेत. हे काम पूर्णपणे सॉफ्टवेअरनेच केले आहे. या प्रक्रियेला सामान्यीकरण असे म्हटले जाते.

पेसा अर्थात, आदिवासीबहूल क्षेत्रातील १३ जिल्ह्यांमधील ५७४ जागांबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच घेण्यात येणार आहे. त्यानंतर येथील निवड प्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
– सरिता नरके, राज्य समन्वयक, तलाठी परीक्षा

blank