तिरोडा:- विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव तालुक्यात विविधविकास कामे आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून मंजूर असून सदर बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार यांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक शाळा हिरडामाली येथे ६०.०० लक्ष,तिर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत तिर्थक्षेत्र संत बह्याबाबा मंदिर कवलेवाडा येथे ४२. ५० लक्ष जिल्हा परिषद शाळा बोरगाव येथे १८. ५० लक्ष, बोरगांव नवरगांव सिमेंट रस्ता १० लक्ष जिवन मिशन अंतर्गत पाणी टाकी बांधकाम ३२. २९ रुपये लक्ष शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद शाळा येथे भारताचे माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती प्रित्यर्थ शाळेत अटल लॅब ५० लक्ष रुपये, ३ नविन वर्गखोल्या व मुलिचे स्वच्छतागृह इमारतीचे लोकार्पण, निधी ६० लक्ष रुपये. सन २०२३-२४ आदर्श ३ नविन वर्गखोली इमारत, निधी ४२ लक्ष रुपये. जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत नविन प्रवेशद्वार, मुलांचे स्वच्छतागृह शालेय परिसराचे नुतनीकरण व इमारत दुरुस्ती, निधी ६० लक्ष रुपये. एकुन २ कोटी १२ लाख रुपयांचे विकासकामांचे भुमिपुजन सोहळा आज जि. प. शहिद जान्या तिम्या हायस्कूल गोरेगांव येथे पार पडला. प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय रहांगडाले आमदार तिरोडा गोरेगांव विधानसभा व भुमिपुजक पंकजभाऊ रहांगडाले अध्यक्ष जि. प. गोरेगांव, . हेमेंतभाऊ पटले माजी आमदार, मनोज बोपचे सभापती पं. स. गोरेगाव,. गिरीधारीजी बघेले सभापती कृउबास गोरेगांव, . पवण पटले सदस्य जि. प. गोंदिया,. लक्ष्मन भगत जि. प. सदस्य, शैलेश जी नंदेश्वर जि. प. सदस्य,. सौ. प्रितीताई कतलाम जि. प. सदस्य, जितेंद्रजी कटरे सदस्य जि. प. गोंदिया, मा. राजकुमार यादव उपसभापती गोरेगांव, तेजेंद्र हरिणखेडे सदस्य कृउबास गोरेगांव, ओमप्रकाश कटरे सदस्य पं. स. गोरेगांव,. सौ. चित्रकला बाई चौधरी सदस्य पं. स. गोरेगांव, किशोर पारधी सदस्य पं. स. गोरेगांव,. संजय बारेवार अध्यक्ष भाजपा गोरेगांव, . सौ. सुप्रिया गणविर सदस्य. पं. स. गोरेगांव, आशिष बारेवार माजी नगराध्यक्ष गोरेगांव,. सौ. शकुंतलाबाई कटरे सरपंच कवलेवाडा,. महेश चौधरी सरपंच हिरडामाली, भारत ठाकुर शा. व्य. समिती हिरडामाली, सौ. मनिषा चोपकर सरपंच बोरगांव,. सौ. तानेश्वरी दिनेश जमदाळ शा. व्य. समिती बोरगांव, तसेच स्थानिक गांवकरी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.