निर्मल पॅरामेडिकल संस्थेत आज निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

0
15

गोंदिया,दि.12ः स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिन निमित्ताने येथील निर्मल इस्टिट्युट आॅफ पॅरामेडिकल व कौशल्य विकास संस्थेत आज 12 जानेवारीला निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी एच.व्ही आव्हारे यांच्या हस्ते माजी नगरसेविका श्रीमती मैथुलाबाई बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आमगावचे प्राचार्य बालाजी सरनाईक,जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती संंजयसिंह टेंभरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष केतन तुरकर,लिलाराम बोपचे,माजी नगरसेवक दिपक बोबडे,औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष उत्पल शर्मा,शरद पाध्ये,बाबा बिसेन,संदीप तुरकर यांच्यासह डाॅ.संजीव चिटणवीस,डाॅ.पायल बघेले,डाॅ.भाग्येश्वर बघेले,डॅा.प्रणिता चिटणवीस,डाॅ.संदीप कोठारी,डाॅ.पुजा कोठारी,डाॅ.राजेंंद्र वैद््य,डाॅ.वैभव तुरकर,डाॅ.मनिषा मिश्रा,डाॅं.संजय माहुले,डाॅ.प्रफुल मिरानी उपस्थित राहणार आहेत.