गोंदिया दि.14 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने गोंदियात आयोजित महायुतीच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या अनुपस्थितीची चर्चा कार्यकर्त्यात दिसून आली. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे विचार वेगळे असले तरी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपली युती असल्याचे सर्वांनी मंचावर सूर व्यक्त केला.
येथील ग्रीन लॅंड सभागृहात आयोजित महायुतीच्या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष येशुलाल उपराडे,लोकसभा प्रभारी माजी मंत्री डाॅ. परिणय फुके,समन्वयक विजय शिवणकर,आमदार विजय रहागंडाले,अपक्ष आमदार विनोद अग्रवाल,राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंंद्रिकापुरे माजी आमदार राजेंद्र जैन,शिवसेना जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे,माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले,माजी आमदार हेमंत पटले,खोमेश्वर रहागंडाले, यांच्यासह भाजप,राष्ट्रवादी व शिवसेना(शिंदेगट),आरपीयआय,व चाबी संघटनेचे नेते मंचावर उपस्थित होते.भाजपवासी झालेले गोंंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी या मेळाव्याकडे चाबी संघटनेच्या महायुतीतील सहभागामुळे पाठ फिरविल्याची चर्चा कार्यकर्त्यात होती,तर त्यांच्याकडून प्रकृती अस्वस्थ असल्याने उपस्थिती नसल्याचे कळविण्यात आले असले तरी त्यांच्या अनुपस्थितीने भाजपसह अनेक कार्यकर्त्यात व नेत्यांत समन्वयचा अभाव असल्याचे दिसून आले.लोकसभा प्रभारी डाॅ.परिणय फुके यांचे भाषण सुरु असतानाच भाजपच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी व सेनेच्या कार्यकर्त्यांनी सभागृहातून काढता पाय घेतल्याचे चित्र बघावयास मिळाले.