जि.प.प्राथमिक शाळा सुरबन येथे नवीन वर्गखोलीचे लोकार्पण

0
24

अर्जुनी मोर.- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरबन येथे नवीन वर्गखोलीचे लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी उद्घाटनीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे कारण शिक्षणामुळे मानवाचा सर्वांगीण विकास घडून येत असतो.म्हणुन आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणुन ते भविष्यातील सुज्ञ तज्ञ शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत व सृजनशील नागरिक घडतील यासाठी प्रयत्न करावे कारण हाच भविष्य उद्या आपल्या गावाचे,तालुक्याचे व देशाचे नावलौकिक करेल.
पुढे बोलताना ते म्हणाले की,आज आपल्या शाळेत नवीन वर्गखोलीचे लोकार्पण झाले आपल्या गावच्या शाळेतील दोन्ही इमारती जीर्ण अवस्थेत आहेत ती समस्या लक्षात घेऊन व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून वर्गखोली मंजुर केली व त्या वर्गखोलीचे लोकार्पण करताना माझा आनंद गगनात मावेनासा झाला माझ्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे आणि क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला, प्रत्येक विद्यार्थ्याने आपापले दुकान लावुन वेगवेगळे दुकाने लावली दुकानदार बनुन व्यवहारीक ज्ञानाचे धडे घेतले,कुणी भाजीपाला ,कुणी चायवाला,ड्रायफ्रुट अश्या प्रकारची विविध दुकाने बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी लावली होती त्यांच्या या कृतीला पालकांनी भरघोष प्रतिसाद दिला.जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांनी प्रत्येक विद्यार्थ्यी दुकानदारांकडून त्यांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी केल्या व सर्व विद्यार्थी व पालकांना वाटुन दिल्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या आम्रपाली डोंगरवार, सरपंच पुष्पाताई डोंगरवार, गोठणगाव चे सरपंच संजय ईश्वार, माजी पंचायत समिती सदस्य दिनदयाल डोंगरवार, कांतीलाल डोंगरवार, पोलिस पाटील ज्योत्सना गोंधळे,शाळा समितीचे अध्यक्ष हेमराज मेश्राम, मुख्याध्यापक कांबळे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.