देवरी तालुक्यातील शेरपार गावात बिबट्याचा मुक्काम

0
27

देवरी- तालुक्यातील ग्राम शेरपार तसेच जवळील परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शेरपार तसेच जनतेमध्ये परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात बिबट्या घुसण्याची तक्रार वन विभागाला गावातील लोकांनी सांगितले असून, वनविभागाने दिवस आणि रात्रीच्या पहारात वाढ केली आहे.तालुक्यातील शेरपार तसेच जवळील परिसरातील असून, मागील आठ दिवसांपासून शेरपार वस्तीलगत बिबट्याचे मुक्काम वाढले आहे.या बिबट्याने गावातील एका कुत्र्याची तसेच शेळीची शिकार केली आहे. त्याचप्रमाणे गावातील एका व्यक्तीवरही हल्ला केला आहे. त्यामुळे शेरपार तसेच आजूबाजूच्या परिसरातील जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामूळे सायंकाळ झाली की, या परिसरातील लोक घराचे दार बंद करून घरात असतात. या घटनेची माहिती देवरी वन विभागाला मिळाली असता, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा बिबट कैद झालेला आहे. यामुळे देवरी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस बिबट्याच्या पहारात वाढ केली आहे. तसेच शेरपार आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.