33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News गडचिरोली पोलिसांनी हिद्दूूरच्या जंगलातून जप्त केले सोप्टक साहित्य

गडचिरोली पोलिसांनी हिद्दूूरच्या जंगलातून जप्त केले सोप्टक साहित्य

0
28

blank

गडचिरोली,दि.08- काही सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर – नारायणपूर – गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉइंटवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उघडलेल्या पो.स्टे.वांगेतुरी आणि पो.म.के.गर्देवाडा या आउट पोस्टची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी बुधवार(दि.07)च्या संध्याकाळी गुप्त सुत्रांकडूून मिळाली.त्या माहितीच्या आधारे हिद्दूर परिसरातील जंगलात नक्षली असल्याची माहिती मिळताच पथकाने जंगलाकडे धाव घेतली.पोलीस पथक हे शोध मोहीम राबवित असतानाच सायंकाळी सात च्या सुमारास नक्षल्यांनी गोळीबार केल्याने पोलिसांनीही प्रत्तित्युर दिले असता नक्षली जंगलात फरार झाले. पोलिसांनी जंगल परिसरात झडती घेतली असता – पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य इत्यादी मिळून आल्याने ते जप्त केले.
अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार C-60 पार्ट्यांचा समावेश असलेले एक पथक सदर भागात शोध मोहिमेवर हिद्दूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर असताना त्यांचेवर सुमारे 19:00 वाजता जोरदार नक्षल्यांकडून गोळीबार करण्यात आला.त्याला गडचिरोली पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. परिसरात झडती घेतली असता – पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य इत्यादी मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले जात आहे

blank