भंडारा दि.8:-जिल्हयात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कर्मचारी प्रशिक्षणाचा शुभारंभ काल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, भंडारा यांच्या निर्देशानुसार नियोजन भवन, भंडारा येथे जिल्हयातील 60-तुमसर, 61-भंडारा व 62-साकोली या तिनही विधानसभा मतदार संघातील, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडीओ चित्रीकरण पथक, व्हीडीओ निरीक्षण पथक तसेच निवडणूक खर्च नियंत्रण समिती पथक जिल्हास्तर, तालुकास्तर या विविध पथकाचे प्रशिक्षणासाठी जिल्हयातील सुमारे 150 कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाकरीता उपस्थितांना आदर्श आचार संहिता, सिव्हिजीलन्स ॲप, ईएसएमस, ॲप उमेदवार निवडणूक खर्च नियंत्रण कामकाज तसेच विविध पथकांमार्फत जिल्हयातील राजकीय सभा, बेकायदेशीर रित्या मतदारांना प्रलोभन म्हणून पैसै, वस्तु वाटप, इत्यादी विविध आचारसंहिता भंगाचे अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबत जिल्हाधिकारी, योगेश कुंभेजकर, डॉ.संतोष सोनी, मुख्य लेखा व वित्त अधि.जि.प.भंडारा, लिना फलके, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा, संदिप लोखंडे,जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (NIC) भंडारा यांनी मार्गदर्शन केले.