मोहाडी ग्राम पंचायत येथे अठरा लक्ष रूपयाच्या विकासकामांचे भूमिपूजन

0
21

गोरेगाव,दि.९- तालुक्यातील मोहाडी ग्राम पंचायत येथे मागील एक वर्षापासून गावातील विविध विकासकामे जोमात सुरू आहेत.त्यातच 18 लक्ष रुपयाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मुंडीपार जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मण भगत यांच्या हस्ते आज 9 फेर्बुवारीला करण्यात आले. यात जीवनलाल कटरे यांच्या घरापासून ते विठ्ठल हरिणखेडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम ७ लक्ष रूपये, अंगणवाडी क्रमांक १ येथे पेव्हिंग ब्लॉग बसविणे ३ लक्ष रूपये, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे शौचालय बांधकाम दुरुस्ती व रंगरंगोटी करणे ५ लक्ष रूपये व श्रीराम मंदिर देवस्थान परिसर येथे पेव्हिंग ब्लॉग बसविणे ३ लक्ष रूपये अशा कामांचा समावेश आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे, प्रमुख अतिथी ग्रांम पंचायत उपसरपंच मोहनलाल पटले,कमलेश पटेल,जे.जे.पटले,वाय.एफ.पटले,एन.के.बिसेन,आर.एफ.पारधी,माजी सरपंच रजनीताई धपाडे, माजी सैनिक कुवरलाल चौधरी, ग्राम पंचायत सदस्य पुस्तकला पटले, पुजाताई डोहाळे, रोजगार सेवक चेतेश्वरी पटले, हिरामण पटले, नारायण बघेले, शिवराम मोहनकार, तेजलाल कावडे, लक्षीराम भोयर, पालिकराम पटले, विक्की धपाडे, सेवकराम राणे,भुराजी भोयर, चुळामन पटले,टेलिराम पटले,टि.पी.डावखरे, भाऊलाल तुरकर, टोलीराम भोयर,भुवन राऊत, बंन्टी चौव्हाण बलिराम वाळवे, धिरजकुमार राहांगडाले श्रीद्वार पटले आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रामसेवक पी.बी.टेंभरे यांनी केले.