खंजेरी भजन स्पर्धा पुरुष गटात सार्थक मंडळ हस्तापूर तर महिला गटात कोकणाई मंडळ कवठा प्रथम विजेते

0
23

अर्जुनी मोर. – तालुक्यातील धाबेटेकडी/ आदर्श येथे 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुरुष व महिला गटांसाठी आयोजित या स्पर्धेत पुरुष गटात १८ संघ तर महिला गटात १२ संघ असे ३० भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पुरुष गटात सार्थक भजनी मंडळ हस्तापूर तर महिला गटात जय कोकणाई माता भजन मंडळ कवठा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

विदर्भ स्तरीय भजनी स्पर्धेत महिला पुरुष गटामधून एकूण 30 भजनी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांक सार्थक भजन मंडळ हस्तापूर ,द्वितीय आदर्श भजन मंडळ निमगव्हाण, तिसरे गुरुदेव मंडळ हिरापूर, चौथे राष्ट्रसंत भजन मंडळ जुनोना, पाचवे गुरुदेव मंडळ अंतरगाव, सहावे शाहू महाराज मंडळ दहेली, सातवे गुरुदेव भजन मंडळ विहिरगाव, आठवे गुरुकुंज मंडळ मोझरी, तर नववे बक्षीस सूर संगम मंडळ धाबेटेकडी/ आदर्श, तर महिला गटात प्रथम बक्षीस कोकणाई माता मंडळ कवठा, द्वितीय साई लक्ष्मी मंडळ सेदुरवाफा, तीसरे शारदा मंडळ आरमोरी, चौथे सरस्वती संगीत मंडळ अर्जुनी मोर., पाचवे आदर्श मंडळ अर्जुनी मोर., तर सहावे बक्षीस संत मीराबाई मंडळ ताडगाव यांनी पटकाविला तसेच वैयक्तिक बक्षिसे ही देण्यात आली. प्रास्ताविक सरपंच संध्या आरसोडे, संचालन घनश्याम हातझाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अरविंद जांभुळकर ,अंबरदास भोवते, हिराजी मानापुरे, राकेश हातझाडे, योगेश मानापुरे, रवी सोनवाणे, माणिक सोनवाने, प्रेमचंद मानापुरे ,महेश हातझाडे, अभिषेक डोंगरवार, देवचंद सोनवाणे, मंगेश हातझाडे, वामन शहारे ,महेश शेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.