‘आमची शाळा-आदर्श शाळा’ : ‘एकोडी’ जि.प. शाळा ठरली No. १

0
320

जिल्हास्तरावर एकोडी प्रथम, बाम्हणी व्दितीय तर उचेपूर व चोरखमारा तृतीय

गोंदिया : जिल्हा परिषद शाळांच्या  भौतिक सुविधेत वाढ व्हावी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तसेच सातत्यपूर्ण सर्वकष शिक्षण मिळावे, या उद्देशाने आमची शाळा-आदर्श शाळा या उपक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या वतीने होत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान तालुका व जिल्हा पातळीवर उपक्रमाच्या निकषाप्रमाणे शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांचे १० ते १५ फेब्रुवारीपर्यंत मुल्यांकन करण्यात आले. या मुल्यांकनात गोंदिया जिल्ह्यात एकोडी जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. तर आमगाव तालुक्यातील जि.प.शाळा बाम्हणी व्दितीय तसेच देवरी तालुक्यातील उचेपूर व तिरोडा तालुक्यातील चोरखमारा या जि.प.शाळेत संयुक्तरित्या तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

सन २०१९ पासून आमची शाळा-आदर्श शाळा हे  उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधेत वाढ करणे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत विशेष भर घालणे हा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात शाळेतील भौतिक सोयी सुविधा अद्यावत करणे, पोषण आहाराचा मेनु तयार करणे, ग्रंथालय, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, शिष्यवृत्ती परिक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविणे, विद्यार्थ्यांचे बौध्दिक क्षमता वाढावी, या दृष्टीकोनातून स्पर्धा परीक्षा घेणे यासह अनेक बाबींचा समावेश करण्यात आला होता. शैक्षणिक सत्रात ज्या शाळा उपक्रमाच्या निकषानुरूप काम करीत आहेत. त्या शाळांचे मुल्यांकन करून निवड केली जाते.

शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये सहभागी झालेल्या जिल्हा परिषद शाळांचे केंद्र, तालुका व जिल्हा पातळीवर मुल्यांकन करण्यात आले. हे मुल्यांकन १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले. तालुकास्तरावर प्रथम आलेल्या शाळांची जिल्हा स्तरावर फेर मुल्यांकन करण्यात आले. दरम्यान गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील जि.प.शाळा या उपक्रमात प्रथम आली आहे. त्याचप्रमाणे आमगाव तालुक्यातील जि.प.शाळा बाम्हणी व्दितीय तसेच देवरी तालुक्यातील उचेपूर व तिरोडा तालुक्यातील चोरखमारा या जि.प.शाळेत संयुक्तरित्या तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. हे निकाल शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून जाहिर करण्यात आले आहे.