मुंबई: लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवे चिन्ह मिळाले आहे. नव्या चिन्हामध्ये एक व्यक्ती तुतारी वाजतावात दिसत आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या या चिन्हाबाबत पक्षाने म्हटले की ही गर्वाची बाब आहे.
"एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!"“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024
पक्षाकडून करण्यात आलेल्या विधानानुसार,
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”
असे पक्षाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
याआधी शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह म्हणून वटवृक्ष मिळाले होते. मात्र यावर विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला होता. विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे होते की वटवृक्ष हे त्यांच्या संघटनेचे नोंदणीकृत चिन्ह आहे.
अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली होती.
शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले होते. हे प्रकरण गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित होते. याप्रकरणी एकूण १० सुनावण्या घेण्यात आल्या. या प्रत्येक सुनावणीवेळी शरद पवार हे जातीने हजर होते. निवडणूक आयोगाला दोन्ही गटाकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती.