शिवसेनेचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

0
15

मुंबई,दि.23-शिवसेनेचे जेष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे आज सकाळी निधन झाले.वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या  हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुजाण व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. नगरसेवक, महापौर, विधानपरिषद व विधानसभेचे आमदार, राज्यसभा व लोकसभेचे खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष व मुख्यमंत्री असा त्यांचा ‘गल्ली ते दिल्ली’पर्यंतचा संघर्षमय व प्रदीर्घ राजकीय प्रवास कार्यकर्त्यांच्या नव्या पीढीसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. कला, साहित्य, संस्कृतीवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. अतिशय व्यस्त दैनंदिनी असलेल्या काळातही आपले हे प्रेम त्यांनी कधी कमी होऊ दिले नाही. अभ्यासू व कुशाग्र बुद्धीमत्ता, फर्डे वक्तृत्व तसेच मार्मिक स्वभावाचे धनी असलेल्या मनोहर जोशी सरांकडे उत्तम संघटन कौशल्य होते.

मनोहर जोशींची कारकीर्द 

प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. 1995 साली ते युतीच्या सत्तेत मुख्यमंत्री झाले होते. बालपण-ध्येयाकडे खडतर सुरुवात सुसंस्कृत पण गरिब कुटुंबात जन्म झाल्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या तंत्रानं लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या नशीबी होता. वडिलांबरोबर भिक्षुकी करून पैसे मिळवू लागले.

राजकीय कारकीर्द 

प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे.

मनोहर जोशी मूळचे बीडचे

मनोहर जोशी हे मूळचे बीडचे. त्यांचा जन्म 2  डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली, त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं. 1995 साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.