स्वतंत्र विचारांची स्त्री निर्माण करणे काळाची गरज- प्रा.रूपलाल कावडे

0
17

ग्रांम पंचायत मोहाडी येथे जागतिक महिला दिवस साजरा

गोरेगाव-८ मार्च-महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी जगात दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. तरूणानी हे जाणून घेतले पाहिजे की जिच्या अस्तित्वातुन विश्वातील प्रत्येक पुरूषांची उत्पती होते. स्त्रीत्वाच्या गुणवत्तेमुळेच जगाला जीवनाचे वरदान मिळाले आहे. स्त्रीत्वाचा दर्जा अंगीकरूणच निसर्गाने आणि संपूर्ण सूस्ष्टीने मानवतेचे रक्षण केले आहे. जागतिक महिला दिन हा दिवस जगभरातील महिलांना समप्रित आहे. स्रिया समाजांचा अविभाज्य घटक आहेत च्याची भुमिका कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या निर्मिती आणि विकासात अतुलनीय आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत असे प्रतिपादन मोहाडी ग्राम पंचायत येथे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त प्रमुख मार्गदर्शक गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारप्रमुख प्रा.रूपलाल कावडे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे प्रमुख अतिथी उपसरपंच मोहनलाल पटले, सामाजिक कार्यकर्ता कमलेश पटेल, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.जे.पटले,शिक्षक आर.एफ.पारधी, ग्रामपंचायत सदस्य भिवराज शेंन्डे,योगराज भोयर,पुस्तकला पटले,प्रभा पंधरे,नूत्यकलाबाई पटले, कांचन पटले,अरूण बिसेन, शिवराम मोहनकार, चुळामन पटले, ओमकार येळे,मुलचंद पटले,मुलचंद गोळगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अंगणवाडी सेविका निर्मला भोयर तर कार्यक्रमाचे आभार अंगणवाडी सेविका मंगलाताई चौव्हाण यांनी केले यावेळी गावातील महिला पुरूष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.