33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय गडचिरोली चिमूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम ?

गडचिरोली चिमूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम ?

0
45

blank

गडचिरोली : गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ महायुतीमधील नवीन समिकरणानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार, की भाजपकडे कायम राहणार याचा फैसला आज होणार आहे. भाजपकडे कायम राहिल्यास उमेदवार कोण राहणार याचाही निर्णय आज घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या मतदार संघातील तमाम नागरिकांमध्ये याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधून कोण लढणार हे जाणून घेण्यासाठी आणखी एक-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात, म्हणजे 19 एप्रिल रोजी मतदान होणार असलेल्या गडचिरोली-चिमूर मतदार संघात यावेळी उमेदवारीसाठी चढाओढ निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून ही जागा काँग्रेस लढविणार आहे. मात्र महायुतीत या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडविण्यासाठी दिल्ली दरबारी खलबते सुरू आहेत.
भाजपकडून या मतदार संघात हॅट्रिक साधण्याचा विद्यमान खासदार अशोक नेते यांचा मानस आहे. नव्याने राजकीय धडे गिरवत असलेले डॅा.मिलिंद नरोटे यांचेही नाव या स्पर्धेत घुसविण्यात आले आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात ही जागा गेल्यास धर्मरावबाबा आत्राम मैदानात उतरतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.तर असे झाल्यास या मतदार संघातील लढत आणखी चुरशीची होऊ शकते असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

# यातच भाजप महायुतीत आता गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील काही नेते राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाऊन भेटल्याने ही जागा राष्ट्रवादीला देण्याचे निश्चित झाले असल्याचे मत ज्येष्ठ नेते यांनी दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे भाजपतील काही फुटीर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या करिता गळाभेट केल्याने ही जागा राष्ट्रवादीला महायुतीत देण्यासाठी मोठी खेळी केल्याची बाब समोर आली आहे.राष्ट्रवादी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात मात्र एकच आमदार असताना भाजप आपला बालेकिल्ला हा राष्ट्रवादीला देत असल्याने संपूर्ण मतदार संघात पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात नाराजीचा सुर निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने संकेत मिळताच त्यांनी हालचालींना वेग दिले आहे.

blank