अखेर महारिटोला सरपंच पायउतार

0
22

आमगाव:-तालुक्यांतील महारीटोला ग्रामपंचायत येथे सरपंच विरुध्द सदस्यांनी घेतलेली विरोधी भूमिका अविश्वास प्रस्तावावर शेवट करण्यात सदस्यांना यश आले व सरपंच अखेर पायउतार झाले.
महारीटोला ग्राम पंचायत मधील सरपंच रीता संतोष मेंढे यांच्या विरोधात ग्राम पंचायत सदस्य यांनी घेतलेले अविश्वास ठराव ७ विरुध्द २ अश्या मतांनी पारित करण्यात आले.
महारीटोला येथील सरपंच रीता संतोष मेंढे यांनी आपल्या अनियमित कामे व सदस्य यांना विश्वासात न घेता अनधिकृत कामे करून गावात रोष ओढवून घेतला होता. सदस्यांनी अनेकदा याबाबद ग्राम पंचायत सभेत मुद्दा उपस्थित केला होता परंतु सरपंच यांचे कार्य समाधान पद्धतीने नसल्याने शेवटी सदस्यांनी याविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर शेवट केला.
दिनांक १८ मार्चला ग्रामपंचायत कार्यालय मध्ये अविश्वास प्रस्ताव सदस्यांनी सहभाग घेत सरपंच विरुध्द ७ तर सरपंच यांना २ समर्थनात मते मिळाली.यावेळी प्रशासनाचे अधिकारी निवडणूक अधिकारी व तहसिलदार डॉ.रवींद्र होळी ,नायब तहसीलदार गुणवंत भुजाडे, विस्तार अधिकारी कुटे, पोलीस निरीक्षक युवराज हांडे उपस्थित होते.
विशेष म्हणजे काही महिलांनी सरपंच रीता संतोष मेंढे यांच्या समर्थनात ठिय्या आंदोलन करून गावात नागरिकांना व ग्राम पंचायत सदस्य यांच्यापुढे आपली भूमिका मांडण्यासाठी वेळ मागितली होती. परंतु यात त्यांना संधी देण्यात आली नाही. व अविश्वास ठराव संमत करून पायउतार करण्यात आले.