41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय पटेलांना सोडून माजी खासदार मधुकर कुकडे परतले शरद पवार गटात

पटेलांना सोडून माजी खासदार मधुकर कुकडे परतले शरद पवार गटात

0
30

blank

भंडारा,दि.21 : राष्ट्रवादी काग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल यांचे खंदे समर्थक असलेले माजी खासदार मधुकर कुकडे यांनी प्रफुल पटेलांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.शरद पवार गटाची भंडाऱ्यात पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक होती.त्या बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार मधुकर कुकडे हे देखील हजर होते. त्यामुळे मधुकर कुकडे यांनी या बैठकीला लावलेली उपस्थिती म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांना हा जबर धक्का मानला जातोय. ‘ शरद पवार हे जगातील पहिले नेते आहेत ज्यांनी शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना खताचे भाव वाढले नाहीत. मात्र, आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळेच त्यांच्या विचारधारेसोबत आहे’, अशी प्रतिक्रिया कुकडे यांनी दिली.

blank