26.2 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home राजकीय नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांचे सहा...

नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांचे सहा अर्ज

0
63
नागपूर, दि. १ – नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी आज दि. १ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पाच उमेदवारांचे सहा नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. यात राजीव पोतदार (भारतीय जनता पार्टी), राजेश जंगले (अपक्ष), सुरेंद्र लोही (अपक्ष), दिनेश ढोले (इंडियन नॅशनल काँग्रेस), अतुल लोंढे (इंडियन नॅशनल काँग्रेस) या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यात भारतीय जनता पार्टीकडून राजीव पोतदार यांनी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी 25 मे 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दि. 1 जून होती. अर्जांची छाननी मंगळवार,दि. 2 जून रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरूवार दि. 4 जून आहे. या पोटनिवडणुकीसाठी मतदान गुरूवार दि. 18 जून रोजी होत असून सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी सोमवार, दि. 22 जून रोजी करण्यात येईल.blank

blank