39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का; महिला उपजिल्हाप्रमुख आशा केदारी यांचा राजीनामा

शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का; महिला उपजिल्हाप्रमुख आशा केदारी यांचा राजीनामा

0
11

blank

संगमनेर -तालुक्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सौ. आशा संदीप केदारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी संपर्क प्रमुख यांचे मार्फत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठविलेल्या पत्राद्वारे महिला उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा सादर केला आहे.
३ जून २०२६ रोजी दिलेल्या राजीनामा पत्रात आशा केदारी यांनी “वैयक्तिक कारणांमुळे” पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संगमनेरसह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी स्थानिक राजकारणावर त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महिला आघाडीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजीनाम्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, केदारी यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या संगमनेर तालुक्यातील महिला संघटनात्मक बांधणीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, आगामी काळात आशा केदारी कोणत्या पक्षात प्रवेश करतात किंवा सक्रिय राजकारणात कोणती भूमिका घेतात, यावर तालुक्यातील महिला राजकारणाची समीकरणे अवलंबून राहू शकतात.”राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे असल्याचे पत्रात नमूद असले, तरी त्यामागील राजकीय कारणांचा शोध घेण्यास आता राजकीय वर्तुळात सुरुवात झाली आहे.

blank