शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे जि. प. समोर निदर्शने आंदोलन

0
32

गोंदिया-महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (संलग्न आयटक )चे राज्यव्यापी आंदोलनाच्या आव्हानानुसार आज (12जून )रोजी गोंदिया जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी गोंदिया जिल्हापरिषदे समोर निदर्शने आंदोलनाच्या माध्यमाने जी. प. शिक्षण अधिकारी कार्यालयात लेखाधिकारी (शापोआ )श्री प्रवीण वैद्य यांना निवेदन सादर केले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रामुख्याने आयटक चे राज्य सचिव मिलिंद गणवीर, जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, युनियन च्या जिल्हा सचिव करुणा गणवीर, संगीता कापसे, धनुबाई उईके, गीता नागोशे, निरुताई जांभूळकर यांनी केले , मान्य केलेला मानधन वाढीचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करा, 20 पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळांना बंद करू नये, मार्च, एप्रिल चा मानधन त्वरित द्या, थकीत असलेला इंधन व भाजीपाला बिल अदा करा, शासन निर्णयाचे पालन न करता कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्या, वेतनश्रेणी लागू करणे, 12महिन्याचे मानधन लागू करा सह इतर मागण्यांना घेवून हे आंदोलन करण्यात आले यात शिल्पा लंजे,जीवन पुणेकर, सुभाष मानकर,पंचफुला बावंथडे, गुननबाई बिसेन, सविता उके, आशा मेश्राम, प्रभाबाई उईके, धनवंता कोहळे,अनघा मिश्रा,भाविका राऊत, प्रभा घरत, पुष्पा नेवारे, सुनीता मेश्राम, रुपाली नेवारे सह इतर कर्मचारी शामिल होते.