एकही दिव्यांग विद्यार्थी सर्वेक्षणातून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. – ceo एम. मुरुगानंथम

0
373

– दिनांक 15 ते 30 जून पर्यंत होणार सर्वेक्षण.
– समग्र शिक्षा विभागाचा उपक्रम.
गोंदिया-जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी व शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग मुलास त्याचा हक्क मिळावा. त्याला लागणाऱ्या सेवेपासून एकही दिव्यांग विद्यार्थी वंचित राहणार नाही या करीता (ता.१५)पासून सुरु होणाऱ्या सर्वेक्षणातून एकही दिव्यांग मुल सुटणार नाही याची विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथम यांनी दिले. ते समग्र शिक्षा विभागाचा दिव्यांग विभागार्फत आयोजित सर्वेक्षण नियोजन सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते.

शासनाने दिनांक 15 ते 30 जून 2024 या कालावधी मध्ये जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी तथा शाळा – महाविद्यालयात दिव्यांग मुलांचा सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला असुन गोंदिया जिल्ह्यातील सर्व 1642 शाळांमध्ये दिव्यांग विभागाचे कर्मचारी उद्यापासून सर्वेक्षण करणार आहेत. याकरिता (ता. १४) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वसंतराव नाईक सभागृहात सर्व कर्मचाऱ्यांची सभा घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सर्वेक्षण करण्याकरीता नियोजन करावे. तसेच यात अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांची पण मदत घेण्याचे निर्देश दिले. जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी उपक्रमाची माहिती देवून सर्वेक्षणात आढळणाऱ्या नवीन मुलांना संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळतो अथवा नाही याची खातरजमा करण्याचे सांगितले. तसे स्वयं स्पष्ट आदेश आज जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण), सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व एकात्मिक बाल विकास अधिकारी, नगर परिषद व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
सभेला तालुक्यातील 16 समावेशित शिक्षण तज्ज्ञ व 39 विशेष शिक्षक उपस्थित होते. सभेच्या सादरीकरण करीता  प्रदीप वालदे व  विकास लिल्हारे यांनी तांत्रीक सहकार्य केले.