
आठवडयाला खोदकामाच्या अहवालावर शेरा मारण्याचे निर्देश,त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
गौणखनिज खोदकामाच्या ठिकाणी नोंदवहीची वाणवा
आजपर्यंत किती ब्रास गौणखणिजाचे खोदकाम प्रशासन गप्प
रजेगावच्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनावर केला आरोप
गोंदिया(खेमेंद्र कटरे)- जिल्ह्यात महामार्गाचे बांधकाम करताना परिसरातील नदी, नाले आणि तलावांच्या खोलीकरणातून माती-मुरूम मिळविला. त्यामुळे बांधकाम खर्चात कपात होऊन महामार्ग परिसरात समृद्ध भूपृष्ठीय जलसाठे आणि पुनर्भरण प्रक्रियेतून भूजलसाठे तयार होत असले तरी किती ब्रास गौणखनिजाचे खरं उत्खणन करण्यात आले.मंजुरीपेक्षा अधिक तर झाले नाही ना याचा शोध मात्र कुठेच घेतला जात नसल्याने शासकीय यंत्रणेवर खासगी कंत्राटदार आर्थिक प्रलोबनातून वरचढ ठरत आहेत.अनेक ठिकाणाहून मंंजुरीपेक्षा अधिक उत्खणन होत असतांना महसूल व खनिकर्म विभाग डोळेझाक करुन बसलेला आहे.त्यातच जून महिना आलेला असून काही दिवसातच पावसाला सुरवात होणार आहे,अशाही परिस्थितीत खोदकाम झालेल्या जागेची मोजणी महसूलसह पाटबंधारे विभागाने न केल्याने अचानक पाऊस आल्यास खोदकामाचे खरं क्षेत्र मोजताच येणार नाही,हे ठाऊक असताना सुध्दा जिल्हाधिकारीपासून सर्वच यंत्रणा गप्प का अशा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
रस्त्यांचे बांधकाम करताना मुरूम, रेती, मातीची गरज पडते. त्यासाठी अधिकचा खर्च करावा लागतो. महामार्गाचे काम सुरू आहे त्याच भागातील गाव तलाव, पाझर तलाव, नदी, नाले, शेततळ्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करून त्यातील मुरूम, माती महामार्गांच्या बांधकामासाठी वापरल्यास खर्चात कपात होऊन जलसंवर्धनावर वेगळा खर्च होणार्या निधीचा व्यय थांबू शकते.हा मुलमंत्र स्विकारून देशभरातील रस्ते बांधणीकरीता तलाव,नदी नाल्यातील मुरूम मातीचा वापर करण्यात येत आहे.
गोंदिया जिल्ह्यातही या नियमाचे पालन जिल्हाधिकारी यांचे आदेशाने रस्ता तयार करणारी कंपनी करीत आहे.मात्र ज्या कंपनीला तलावातून माती व मुरूमचे उत्खणन करण्याची परवानी देण्यात आली,त्या कंपनीने दर आठवड्याला आपला अहवाल संबधित विभागाला सादर करणे आवश्यक असते.तसेच त्या कार्यक्षेत्रातील तहसिलदार, तलाठी व तलाव ज्या विभागातंर्गत येते त्या विभागाच्या अभियंंत्यापासून कार्य.अभियंत्यापर्यंत सर्वांना साप्तिहक भेट देऊन त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे.मात्र गोंदिया जिल्ह्यात या सर्व बाबींना फाटा देण्यात येत असल्याचे चित्र प्रत्यक्ष खोदकामस्थळावर भेट दिल्यानंंतर बघावयास मिळाले.
बालाघाट-गोंदिया या राष्ट्रिय महामार्ग क्रमांक ७५३ च्या चौपदीकरणाचे काम सध्या सुरु असून गोंंदिया तालुक्यातील रजेगाव व खमारी येथील जिल्हा परिषदेच्या तलावातून माती व मुरुमाचे मोठया प्रमाणात उत्खणन सुरु आहे.त्याठिकाणी उत्खणन करणार्या यंत्रणाकडे कुठलीच नों

रजेगाव येथील नागरिकांनी तर ज्याप्रमाणे तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे,त्याकडे बघितल्यास सदर तलाव हे भविष्यात मृत्यूचे डोह ठरणार अशी भिती व्यक्त केली आहे.तसेच रजेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सुध्दा तलाव खोलीकरणाचा प्रस्ताव समंत करण्यता आला नसल्याचे सांगितले.जिल्हाधिकारी स्वमर्जीनेच ग्रामसभांचे अधिकार हिरावून तलावांच्या खोलीकरणाला परवानगी देत असल्याचेही नागरिकांचे म्हणने आहे. रजेगाव येथील तलाव खोलीकरणातून किती ब्रास मातीमिश्रीत मुरुमाचे उत्खणन करण्यात आले, याबदद्ल तलाठी बालाराम बनोठे यांना विचारणा केली असता आपण अद्याप त्याठिकाणी भेट दिली नसल्याचे सांगितले.
तर गोंदिया जिल्ह्यातील रस्ते बांधकामात किती ठिकाणी रस्तेबांधकाम कंपनीला माती,मुरूम उत्खणनाची परवानगी देण्यात आली.दिलेल्या परवानगीनुसार किती ब्रास गौणखनिजाचे उत्खणन झाले याबद्दल जिल्हा खनिकर्म अधिकारी सचिन वाढवे यांना विचारणा केल्यावर परवानगी दिली आहे.मात्र आपणाकडे माहिती देण्यास सध्या वेळ नाही असे सांगत माहिती देण्यास टाळले.
तर जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातंर्गंत येत असलेल्या खमारी व रजेगाव येथील तलावातून माती मुरूमाचे उत्खणन गेल्या महिन्याभरापासून सुरु असल्याने किती ब्रास गौणखनिजाचे उत्खणन झाले याबद्दल कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी संबधित काम बघणारे अधिकारी रजेवर असल्याचे सांगितले.