देवरी नजिक मालवाहकाची झाडाला धडकः एक ठार

0
166
वाढदिवसाच्या शुभेच्छा

देवरी,दि.१५- देवरी पासून दक्षिणेला ८ किलोमीटर अंतरावर चिचगड-देवरी महामार्गावर असलेल्या कलचुवाच्या शिवारात एका मालवाहकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या बेहड्याच्या झाडाला दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर इतर जण जखमी झाल्याची घटना आज (दि.१५) दुपारी बाराच्या सुमारास घडली. देवरी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मृताचे नाव ज्योतिलाल  कोराम (वय २२) राहणार परसोडी असे आहे. तर जखमींमध्ये  हिवराज मलये (वय३०) राहणार फुटाणा आणि  आनंदराव सिंद्राम  (वय ३५) राहणार मासुलकसा असे आहे.
सविस्तर असे की, चिचगडकडून देवरीच्या दिशेने धान घेऊन भरधाव येणाऱ्या मालवाहू मोटार (क्र. एमएच ४२-एम-४६९८) च्या चालकाचे कलुसावटोला नजिक वाहनावरील नियंंत्रण सुटल्याने रस्त्याचे कडेला असलेल्या बेहड्याच्या झाडाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मोटारीत असलेल्या ज्योतिलालचा जागीच मृत्यू झाला तर इतर  दोन जण गंभीर रीत्या जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. जखमींना पुढील उपचारासाठी देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले  होते. जखमींची परिस्थिती नाजूक असल्यांना त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे पाठविण्यात आले. पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत.