35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ वीज पडून एका म्हशीचा मृत्यू व एक ईसम जखमी

वीज पडून एका म्हशीचा मृत्यू व एक ईसम जखमी

0
195

blank

सडक अर्जुनी:– तालुक्यातील कोसमतोंडी येथे दि.१८ जून रोजी सांयकाळी ४ वाजे दरम्यान आलेल्या वादळी व वीजांचे गडगडाटासह आलेल्या पावसाने वीज पडून एका म्हशीचा मृत्यू व एक ईसम जखमी झाले. कोसमतोडी येथील महादेव सोनवाने अंगणात म्हैस बांधत असतांनी अचानक वीज पडून त्यांचे एका म्हशीचा मृत्यू झाला.तर महादेव सोनवाने जखमी झाले. त्यांना लगेच उपचारांसाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याची प्रकृती स्थिर आहे उपचार सुरु आहे..घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी,तलाठी व कोतवाल यांनी मृत म्हशींचा मोका पंचनामा करण्यात आला.वीज पडून मृत झालेल्या म्हशींचे जवळपास ४० हजारांचे नुकसान झाले असून ईसम जखमी झाला आहे.शासनाने त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.

blank