कुंभारेनगर येथे मुलाची हत्या

0
466
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया : शहरातील कुंभारेनगर येथील आंबेडकर भवन येथे दोन मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून १७ वर्षीय मुलाची हत्या केली. ही घटना मंगळवारी ( ता. १८) रात्री दहाच्या सुमारास घडली. उज्वल निशांत मेश्राम ( वय १७, रा. भीमनगर, गोंदिया) असे मृताचे नाव आहे.
यातील मारेकरी २० ते २२ वर्षे वयोगटातील आहेत. घटनेच्या दिवशी दोन्ही मारेकऱ्यांनी उज्वलला घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्याला कुंभारेनगर येथील आंबेडकर भवन येथे नेऊन धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केला. यात गंभीर जखमी उज्वलला रुग्णालयात नेत असताना त्यायचा मृत्यू झाला. त्याची हत्या कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम करीत आहेत.
गोंदिया शहर आणि जिल्ह्यात सातत्याने घडत असलेल्या घटनांमुळे भीतीचे वातावरण आहे.