
देसाईगंज दि.१-देसाईगंज (वडसा) पासून अगदी जवळ असलेल्या आमगाव येथील कारमेल अकॅडमी मध्ये केजीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी कारमेल अकॅडमी मुख्याध्यापक फादर जिनेश मॅथू आणि उपमुख्याधापिका मिस्टर लिटी तसेच शिक्षकप्रमुख दिशाली चावके आणि विभाण प्रमुख पुनम पुरी व विद्यार्थ्यांचे पालकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.यावेळी चिमुकल्या मुलांच्या मनोरंजना साठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋतुजा देवसकर, जयश्री रामटेके, शाफिया शेख, रिना मुंजनकर आणि स्वाती बन्सोड यांनी मोलाची कामगिरी बजावली.