34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ 100 युनिटपर्यंतचे घरगुती वीज बिल माफ करा – आमदार विनोद अग्रवाल

100 युनिटपर्यंतचे घरगुती वीज बिल माफ करा – आमदार विनोद अग्रवाल

0
193

blank

आमदार अग्रवाल यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विधानसभेत मागणी
गोंदिया :– महाराष्ट्र राज्यात सध्या सरकारचे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे ज्यामध्ये राज्य सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले असून त्यात आमदार विनोद अग्रवाल यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडली बहना योजना सुरू करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकड़े केली होती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दाखवली होती आणि त्यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडली बहना योजना जाहीर केली, त्याचा फायदा येथील जनतेला होणार आहे.

घरगुती वीज बिलाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला असून त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊन वीज दर कमी करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला जात होता, याला प्राधान्य देत जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी वीज बिलात सवलत देण्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्र विधानसभेमध्ये 100 युनिटपर्यंतचे घरगुती वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहे. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना एक पत्रही सुपूर्द केले असून, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऊर्जा विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या निर्णयाबद्दल आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले आभार

आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले तसेच घरगुती विजेच्या बाबतीत 100 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे जेणेकरून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यास महाराष्ट्रातील जनतेला वीज बिलाच्या समस्येपासून दिलासा मिळेल, अशी मागणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

blank