
गोंदिया,दि.१७ः गोंदिया जिल्हा मजूर सहकारी संस्थाचा संघ मर्या गोंदियाच्या नुकत्याच २०२४-२९ या वर्षाकरीता झालेल्या निवडणुकीत विकास एकता पॅनलचे सर्व १५ संचालक विजयी झाले.त्यानंतर १६ जुर्ले रोजी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी सचिन सूरज मिश्रा व उपाध्यक्ष पदावर दिपक कृष्णराव कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.गोंदिया जिल्हा मजूर सहकारी संस्थेशी ७२ संस्था सलंग्न आहेत.निवडून आलेल्या संचालकाना व पदाधिकारी यांना राजेंद्र एन जैन,राजाभाऊ गुबरेले,श्यामभाऊ चन्दनकर,सतिश राउत,तिलक लारोकर,गुणवंत चन्दनकर,धनिराम भंडारी,लोकेश नागपुरे,सविता माने,सविता चंद्रिकापूरे,टूलेन्द्र कटरे,प्रतीक कदम, संतोष कायते,जयंत कछवा,छाया कुंभलकर,राजेश केलंका,सतीश चव्हाण,यश चौरसिया,पंकज मिश्रा,नरेश भेंडारकर यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.