24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home गुन्हेवार्ता हवालदाराने गोरेगाव पोलीस ठाण्यातच केले विष प्राशन

हवालदाराने गोरेगाव पोलीस ठाण्यातच केले विष प्राशन

0
699

गोरेगाव,दि.२१- येथील पोलीस ठाण्यातील कार्यरत हवालदार राजेश जौंजाळ (बक्कल नंबर ९३५) यांनी पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १९ जुलै रोजी रात्री उघडकीस आली. घटनेच्या दिवशी राजेश जौंजाळ पोलीस ठाण्यातील खोलीत कार्यरत होते. यावेळी राजेशने कीटकनाशक प्राशन केले. हा प्रकार इतर पोलीस सहकाऱ्यांच्या निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. येथून प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना गोंदियाला हलवण्यात आले. त्यांच्यावर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण अद्याप समजू शकले नाही.