25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home गुन्हेवार्ता गंगाधरी आश्रमशाळेजवळ भीषण अपघात: धापेवाडा लोधीटोला येथे तिघांचा जागीच मृत्यू

गंगाधरी आश्रमशाळेजवळ भीषण अपघात: धापेवाडा लोधीटोला येथे तिघांचा जागीच मृत्यू

0
27

गोंदिया,दि.१६-गोंदिया तिरोडा राज्य महामार्गावरील ​गंगाझरी येथील आश्रमशाळेजवळ आज सायंकाळी ७:०० वाजताच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुचाकीने प्रवास करणाऱ्या तिघांना एका अनियंत्रित चारचाकी वाहनाने जबर धडक दिल्याने, दुचाकीवरील तिन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.मृतकामध्ये सौरभ जयसिंह बघेले,गौरव गणेश बैठवार, निखिल वासुदेव मेश्राम, रा. धापेवाडा,लोधीटोला येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.