26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home शैक्षणिक भंडारा जिल्हा शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद तिरपुडे व सचिव अनिल पटले

भंडारा जिल्हा शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद तिरपुडे व सचिव अनिल पटले

0
588

विद्यार्थी व शिक्षक हिताचे कार्य करावे.. रवी अंबुले

भंडारा,दि.२२- शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्या सूचनेनुसार तसेच भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या आग्रहास्तव नागपूर विभागीय अध्यक्ष रवींद्रकुमार अंबुले यांचे अध्यक्षतेखाली भंडारा येथील शासकिय विश्रामगृहात शिक्षक सहकार संघटनेची सभा घेत जिल्हा कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.या सभेत जिल्हाध्यक्षपदी अरविद बुधाजी तिरपुडे, सचिव अनिलकुमार मनोहर पटले व कार्याध्यक्ष पदावर सुरेंद्र छोटेलाल ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोंदिया जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम,चंद्रभान दशमेर,प्रमोद शहारे,लाखेश्वर लंजे सचिव,श्री.जगणे,श्री.मरस्कोले,श्री.मेढे,बी.उपराडे उपस्थित होते.यावेळी पुढील प्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये जिल्हाध्यक्ष अरविद बुधाजी तिरपुडे, सचिव अनिलकुमार मनोहर पटले,कार्याध्यक्ष सुरेंद्र छोटेलाल ठाकरे,कोषाध्यक्ष समिर वहाब शेख,उपाध्यक्ष उसेण चंद्रभान गौडाने,सदिय आनंदराव सोल्लाई,विरद्रसेन शिवदास देशभ्रतार,प्रसिद्धी प्रमुख देव विठ्ठल झलके,सुभाष आसाराम कठाणे,संघटक शाहीद अनिस शेख,सचिन सुरेश मेश्राम,किरणकुमार उत्तम चव्हाण,महेश मारबत चव्हाण, मार्गदर्शक रविंद्र उगलमुगले,विधी सल्लागार आशिष ब्रिजलाल बेळकर,सहाय्यक  शैलेश निलकंठ खेताळे,जिल्हा प्रतिनिधी दिनेश खानुजी रामटेके,दशरथ गोपाळ वाट, महिला प्रतिनिधी करुणा धनिराम मेश्राम,स्वेता बाबुलाल भुजाडे,अमृता सुधाकर सेलोकर,ज्योती किरणकुमार चव्हाण यांचा समावेश आहे.यावेळी प्रविण खाडेकर,राजेश नागरीकर,शहानंद मोटघरे,निशिगंध ढोलणे,ए.एस वाडीभस्मे,एम.एम.बोरकर,पितावर मेळे हे शिक्षक उपस्थित होते.