ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास 20 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

0
102

     गोंदिया, दि.5 : बहुजन कल्याण विभागांतर्गत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2024-25 या सत्रापासून सुरु करण्यात आलेली आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 करीता सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

         तरी जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, पतंगा मैदान, गोंदिया यांचेकडे सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद मोहतुरे यांनी केले आहे.