खा.पटेल १४ ऑगष्टला गोंदियात,दुसऱ्यांदा डीपीडीसी बैैठकीला राहणार हजर

0
187

गोंदिया,दि.१३ः राष्ट्रवादी काँँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल उद्या गोंदिया तालुक्याच्या दौऱ्यावर असून दि.१४ ऑगष्ट २०२४ बुधवारला सकाळी ११.०० वाजता गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.विशेष म्हणजे राज्यातील या सरकारच्या कार्यकाळात खा.पटेल हे दुसऱ्यांदा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.यापुर्वी महाविकास आघाडीची सरकार असतांना तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजर होते.
दुपारी ०१.३० वाजता बाजार चौक नवेगाव ता. गोंदिया येथे कार्यकर्ता बैठक,दुपारी ०३.३० वाजता मयुर लॉन, कटंगीकला येथे महिला मेळाव्याला उपस्थित राहून महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व संबोधित करणार आहेत. उपरोक्त कार्यक्रमांना खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत तालुक्यातील वरिष्ठ  पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी उपरोक्त कार्यक्रमांना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केले आहे.