मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळण्याकरिता आ.विजय रहांगडाले यांची गावनिहाय भेट

0
75

तिरोडा:- महिलांना सक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अमलांत आणली असून पात्र महिलांना १५०० रुपये प्रती महिना अनुदान मिळणार आहे. महिलांना सक्षम करणे हा राज्य शासनाचा उद्देश असून यापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये याकरिता शासनातर्फे युद्धस्तरावर कार्य सुरु असून या योजनेचा लाभ विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याना मिळावा याकरिता तिरोडा गोरेगाव विधासभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देत अर्जाचा मागोवा घेत आहेत. तसेच ज्यांचे अर्ज आनलाईनद्वारे रद्द झाले आहेत किंवा त्रुट्या आहेत असे अर्ज तातडीने त्रुटी पूर्तता करून लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबतचे आदेश देण्यात आले.प्रामुख्याने सालेबर्डी, भंबोडी, बिरोली, चांदोरी बूज,घाटकुरोडा, घोगरा, खुरखुडी.पांजरा,खोपडा, सरांडी, धादरी या गावांना भेट देण्यात आली.या भेटीदरम्यान जि.प.सदस्य पवन पटले, रजनी सोयाम, कृउबास तिरोडाचे सभापती जितेंद्र रहांगडाले,प.स.सभापती, कुंता पटले, बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद लिल्हारे, प.स.उपसभापती हुपराज जमाईवार, प.स.सदस्य प्रमिला भलाई, सरपंच विनोद लिल्हारे, महेश लिल्हारे, उषा मोहारे, जयसिंग उपासे, प्रतिमा जैतवार, प्रभाताई राउत, प्रीती भांडारकर, सुलोचना बोपचे, शारदा चामट, उज्ज्वल उके, मिता दमाहे, अजित ठवरे, व संबधीत ग्रामपंचायतचे उपसरपंच, संगणक ऑपरेटर, आशा सेविका व लाभार्थी उपस्थित होते.