भंडारा,दि.२२-ओबीसी विद्यार्थ्यांच्या हिताकरिता वसतिगृह सुरू करणाऱ्या सहायक संचालकांचे ओबीसी बहुजन विभागाच्या सचिवाने केलेले निलबंन रद्द करावे, शासनाने ७२ वसतिगृहे सुरू करण्याचे दिलेले आश्वासन पाळावे,१०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी,ओबीसी विभागाला स्वतंंत्र जागा व ओबीसी अधिकारी देण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन आज गुरूवारी (दि.२२) ओबीसी सेवा संघ,ओबीसी महिला सेवा संंघाच्यावतीने जिल्हाधिकारी योगेश कुंभोजकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
जर शासनाने निलंबन रद्द करून राजेन्द्र भुजाडे यांना सन्मानाने सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग,नागपूर या पदावर पूर्ववत केले नाही तर ओबीसी समाज शांत बसणार नाही.तर महाराष्ट्रभर ओबीसी संघटनांच्यावतीने आंदोलन करण्यात येतील अशा इशारा देण्यात आला.निवेदन देतेवेळी गोपाल सेलोकर अध्यक्ष ओबीसी सेवा संघ, भैय्याजी लांबट, प्रभाकर वैरागडे,भाऊराव वंजारी, तुळशीराम बोंदरे, विनोबा कापसे, श्रीकृष्ण पडोळे, रमेश शहारे, सेवक हजारे, गुरुदेव लिचडे, पुरुषोत्तम समरित, तुषार वाडिभस्मे,मंगला वाडिभस्मे, ललिता देशमुख, लता बोरकर, जयश्री जगनाडे, सुषमा समरित,शुभदा झंझाड,अरुण जगनाडे, रामचंद्र चकोले,एकलव्य सेनेचे डॉ अविनाश नान्हे, सुरेश खंगार,संजीव भुरे, सुभाष उके, अनिल दिघोरे,रवी मानकर, प्रविण मडामे उपस्थित होते.