अर्जुनी मोरगाव,दि.२४ः-येथील शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय , अर्जुनी मोरगाव येथे राष्ट्रीय अवकाश दिवस उत्साहात साजरा करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा श्रीकांत नाकाडे, ग्रंथपाल प्रा.अजय राऊत,शेखर राखडे व आयोजक भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ.डी.एल.चौधरी,प्रा.पंकज उके उपस्थित होते. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस “राष्ट्रीय अंतराळ दिवस” म्हणून घोषित केला.
23 ऑगस्ट 2024 रोजी भारत आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस देश भरात हर्ष व उल्लासाने साजरा करीत आहे . डॉ चौधरी यांनी “राष्ट्रीय अंतराळ दिवस” साजरा करण्या मागील उद्देश्य सखोल माहिती देवून समजावून दिले.प्रा.श्रीकांत नाकाडे यांनी तुम्ही उद्याचे अंतराळ विर असे प्रतिपादन केले व चिकित्सक वृत्तीचे आपल्यामध्ये संगोपन करावे,असे मत व्यक्त केले .
या निमत्ताने महाविद्यालयात ‘ईसरोची उपलब्धि ‘ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त व स्पर्धकांना पारितोषिके व सर्व स्पधेकांना प्रमाणपत्र देण्यात येणार.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.चौधरी यांनी व आभार प्रदर्शन प्रा. पंकज उके यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.शेखर राखडे, डॉ.चौधरी,प्रा.पंकज उके, अनिकेत यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी ‘ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.