गोंदिया,दि.२९ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील राजकोट किल्ल्यावरील भव्य दिव्य शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यल्याप्रकरणी संबधित कंत्राटदारासह शिल्पकारावर कडक कारवाई करुन राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार बरखास्त करण्याची मागणी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज(दि.२९)राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारीमार्फेत पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रेय लाटण्याच्या दृष्टिकोनातून आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शिवप्रेमींना खुश करण्याकरिता कुठलीही तपासणी न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ताबडतोब लोकार्पण करण्यात आले. कुठलेही अनुभव नसणारे नवीन लोकांना पुतळा डिझाईन करण्याचे आणि बनवून उभा करण्याचे कंत्राट देण्यात आले. या कंत्राटामध्ये महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात आपले आर्थिक हितसंबंध जोपासले आणि मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यांचे खिसे गरम करून घेतले. परंतु दुर्दैवाने हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. मुख्यमंत्री सांगतात की वाऱ्यामुळे कोसळला परंतु देशात उभे असणारे कुठलेच पुतळे या वाऱ्यामुळे कोसळले नाही आणि फक्त नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकांपर्यंत झालेला हा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्या उभारण्यासंबंधी केलेल्या केलेल्या हलगर्जीपणाचा निषेध मनोहर चौक य़ेथील शिवाजी महाराजाच्या प्रतिमेसमोर नोंदवला.त्यानंतर यासबंंधिचे एक निवेदन उपविभागीय अधिकारी गोंदिया मार्फत राष्ट्रपती यांना सादर करण्यात आले.ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.निवेदन देतेवेळी प्रदेश काँग्रेस सचिव अमर वर्हाडे,बाजार समितीचे उपसभापती राजकुमार पटले,शहर काँग्रेस अध्यक्ष योगेश अग्रवाल,जहिर अहमद,बाजार समिती संचालक राजीव ठकरेले,गौरव बिसने,अमन तिगाला,देवचंद बिसेन,पवन नागदेवे,अरुण गजभिये,कशिश चंद्रिकापुरे,टी.जी.तुरकर,विष्णु नागरीकर,शैलेष जायस्वाल,नागरत्न बनसोड,मनिष चौहान,भुपेंद्र वैद्य,विजेंद्र बोरांडे आदी उपस्थित होते.