गोंदिया-महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (गोंदिया तालुका ) च्या नेतृत्वात गोंदिया तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी आज नेहरू चौक गोंदिया येथून मोर्चा काढून पंचायत शमक्ष मोर्चा निदर्शने आंदोलन केले. राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर, आयटक जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम, सचिव विनोद शहारे, कार्याध्यक्ष महेंद्र कटरे यांचे नेतृत्वात झालेल्या मोर्चा आंदोलकांशी सहायक गटविकास अधिकारी गावड यांनी निवेदन स्विकारून वरिष्ठाना पाठवण्याचे आश्वाशन दिले.
या मोर्च्याच्या प्रमुख मागण्या मध्ये शासनाचे धोरणा प्रमाणे राज्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे वेतानावरील अनुदानचा शासन हिस्सा संबंधित पंचायत राज ग्राम स्वराज्य अभियान पुणे या एजेन्सी मार्फत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत होतो, पण काही तांत्रिक अडचणीमुळे संदर्भीय पत्र प्रमाणे वेतनाचा शासन हिस्सा मु.कार्य.अधिकारी जिल्हा परिषद कडे वर्ग करण्यात आले आहे.हे अनुदान दर महिण्याच्या 10तारखेच्या आत अदा करणेबाबत शासनाची स्पष्ट सूचना आहे.महासंघाने याबाबत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं )यांना दि. 12/08/2024 ला निवेदन सादर करून 14 ऑगस्ट पर्यंत वेतन अनुदान अदा करण्याचे आश्वाशन मिळाले, पण वेतन मिळाले नाही. या विषयाला घेवून पुन्हा दि. 22/08/2024 ला महासंघाने उप.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले पण अजूनही वेतन मिळाले नाही.म्हणून जिल्हा परिषद कडे जमा वेतन अनुदान कर वसुलीची अट न घालता सर्व कर्मचाऱ्यांचे खात्यात जमा करण्यात यावे., एप्रिल ते जून 2024 या तीन महिन्याचे ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे त्यांचे वेतन ऑगस्ट महिन्याचे वेतना बरोबर जमा करण्यात यावे. भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करण्यात यावी ग्राम पंचायत कडून वेतनाचा व भविष्य निर्वाह निधीचा देय हिस्सा नियमित अदा करण्यात या वेतानाचा शासन हिस्सा पूर्ववत आरजिएस तर्फे इआरपी प्रणाली मध्ये अदा करण्यात यावे 19 महिन्याची वेतन फरकाची रक्कम त्वरित जमा करनेआदी मागण्याचे निवेदन दिले.
या आंदोलनात प्रामुख्याने भाऊलाल कटंगकार, दीप्ती राणे, सहेशराम माहुले, जगदीश ठाकरे, मोहन डोंगरे,माणिकचंद उके, यशवंत दमाहे श्याम कटरे, मुकेश बिसेन,राजेश भोकासे रवी जमरे, संजय कवरे, ताराचंद बावणकर, अमोल घासले, सुनंदा दहिकर, रेखा सरणागात, कल्पना कुंभलकर आदी कर्मचारी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.