गोंदिया :- शहरातील भीमघाट तीर्थक्षेत्र परिसरात आ.विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातुन मंजूर १ कोटी रुपयांचे विकासकामांचे भूमिपूजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.आ.अग्रवाल यांनी बाबासाहेबांच्या जीवन गाथेवर बोलतांना आज बाबासाहेब यांची पुण्याई आहे की मला ५ वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली व जनतेनी मला संधी दिली त्याबद्दल जनतेचे सुद्धा आभार व्यक्त करतो. ५ वर्षाच्या या कार्यकाळ मध्ये मला जनतेचे आमदार या नावाने जनतेनी उद्बोधन केले व त्यांनी उद्बोधन केलेल्या या शब्दावर मी खरं उतरण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतो असे आ.विनोद अग्रवाल यांनी कार्यक्रम दरम्यान बोलले.
आ.विनोद अग्रवाल यांनी आपल्या ५ वर्षाच्या कार्यकाळमध्ये जनतेची सामाजिक समस्या तसेच मूलभूतदृष्ट्या पाहून समाजाच्या अंतिम घटकापर्यंत कार्य पोहचविण्याचे कामे केले आहे त्यांनी जे कार्य केले आहे. पहिल्या टप्यात छोट्या कामांना प्राधान्य देत मोठ्या कामाकड़े त्यानंतर लक्ष देण्याचे या दृष्टीने कार्य केले.क्षेत्रातील अनेक बौद्ध विहार, सामाजिक सभागृह चे सौंदर्यीकरण, बळकटीकरण, परिसरात गट्टू, पथदिवे, वाचनालय स्मारकाचे निर्माण दलित वस्ती मध्ये रस्त्यांचे निर्माण, पिण्याचे पाणीची सोय, अश्या बरेच कार्य केले आहे.पुढेही त्यांचे प्रयत्न जनसेवेसाठी राहणार असल्याची हमी त्यांनी दिली आहे.
कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आ.विनोद अग्रवाल, माजी नगर परिषदेचे गटनेते घनश्याम पानतवने, अमित भालेराव, जिप सदस्य दिपाताई चंद्रिकापुरे, माजी नपा उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी, प.स.सदस्य मीनाक्षीताई बारलिंगे, विनीत शहारे, कुंदाताई पंचबुद्धे, दाराभाऊ बैरीसाल, विष्णूभाऊ नागरीकर, माजी नगरसेवक विजय रगडे, गुड्डूभाऊ बिसेन, हेमंतजी पंधरे, संतोष पटले, विवेक मिश्रा, अनिल शरणागत, प्रकाश टेंभरे, श्याम चौरे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.