गोंदिया जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर,अर्जुनी मोरच्या कु. सरिता घोरमारे यांची निवड

0
3334

अर्जुनी मोर. जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2024-25 जिल्हा परिषद गोंदियाची जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा जाहीर झाली असुन उद्या ता.5 सप्टेंबर ला पुरस्कार वितरण होणार आहे.
गोंदिया जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राथमिक विभाग संदिप सोमवंसी पदविधर शिक्षक जि.प.उ.प्रा.शाळा खमारी मुले( गोंदिया पं.स.),हिवराज रहांगडाले सहा.शिक्षक जि.प.प्रा.शाळा चोरखमारा ( तिरोडा पं.स. ),दिनेश उके पदवीधर शिक्षक जि.प.उ.प्रा.शाळा मोहगाव/बु.( गोरेगाव पं.स. ),सुरेंद्र मेंढे सहा.शिक्षक जि.प.उ.प्रा.शाळा करंजी ( आमगाव पं.स. ), खुमेशप्रसाद कटरे सहा. शिक्षक जि.प.हि.उ.प्रा.शाळा खोलगड ( सालेकसा पं.स.),सुरेंद्र भैसारे पदविधर शिक्षक जि.प.उ.प्रा.शाळा मोरगाव ( अर्जुनी मोर. पं.स.),कु.सुशिला भेलावे सहा.शिक्षक जि.प.उ.प्रा.शाळा मुल्ला ( देवरी पं.स.)
जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार माध्यमिक विभाग इवेंद्र निनावे प्रभारी मुख्याध्यापक जि.प.हाय.व कनिष्ठ महाविद्यालय कट्टीपार ( आमगाव ),जिल्हा उत्कृष्ट शिक्षक निवड पुरस्कार प्राथमिक विभाग विशेष शिक्षक पुरस्कारासाठी कु. सरिता घोरमारे सहाय्यक शिक्षक पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा अर्जुनी मोरगाव क्रमांक एक पंचायत समिती अर्जुनी मोरगाव यांना घोषीत करण्यात आला आहे.
कु. सरिता घोरमारे सहाय्यक शिक्षिका अर्जुनी मोर यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार सर २०२४-२५ जिल्हा परिषद गोंदिया प्राथमिक विभागातून जिल्हा विशेष शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. दुर्गा चौक अर्जुनी मोरगाव परिसरातील प्राथमिक शाळा जीर्ण अवस्थेत व मोडकळीस व बंद होण्याच्या मार्गावर आली असताना सरिता घोरमारे यांनी कसोशीने केलेले प्रयत्न व अहोरात्र मेहनतीने शाळेला संजीवनी मिळत 26 पटाच्या शाळेला 120 पटसंख्या तयार करून सेमी इंग्रजीचे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू केली. मुख्याध्यापक असताना कान्व्हेंट सेक्शन सुरू करून 50 विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेत आहेत. पी एम श्री अंतर्गत विविध योजना व कार्य साकार केले. दर्जेदार गुणवत्ता विकास व सर्वांगीण विकास साधत शाळेची प्रगती कौतुकास्पद आहे हे विशेष, यामुळे कुमारी सरिता घोरमारे यांना प्राथमिक विभागातून जिल्हा विशेष शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पी एम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अर्जुनी मोरगाव क्रमांक एक येथील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.