39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ पवार महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.आरती पारधी तर सचिव सौ.ठाकरे

पवार महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.आरती पारधी तर सचिव सौ.ठाकरे

0
318

blank

महिला समिती गठीत
गोंदिया : पवार प्रगतिशील मंचच्या वतीने पवार महिला समितीचे गठन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी सौ.आरती पारधी तर सचिव पदावर सौ.दुर्गा संजय ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.
पवार सांस्कृतिक भवन येथे २५ सप्टेंबर रोजी महिला समिती गठीत करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पवार प्रगतिशील मंचचे अध्यक्ष अ‍ॅड.पृथ्वीराज चव्हाण, सचिव डॉ.प्रीती देशमुख (गौतम), शिक्षण संस्था अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती, मंचचे उपाध्यक्ष पन्नालाल ठाकरे, कोषाध्यक्ष सुरेश पटले, संघटन सचिव अजय रहांगडाले, सहसचिव बंटी बोपचे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्वसंमतीने पवार महिला समिती गठीत करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी सौ.आरती शैलेंद्र कटरे (पारधी), सचिव सौ.दुर्गा संजय ठाकरे, उपाध्यक्ष म्हणून सौ.शैफाली शैलेश बिसेन, सौ.दिप्ती घनश्याम पटले, सौ.रंजू सचिन रहांगडाले, सौ.आरती महेंद्र चौधरी, सहसचिव सौ.मोहिनी उमेद बोपचे, कोषाध्यक्ष सौ.राजकुमारी रुपेंद्र कटरे, संघटन सचिव सौ.शिल्पा सुनिल पटले, प्रचार सचिव सौ.सुनिता विनोद कटरे यांची निवड करण्यात आली. तर सदस्यांमध्ये सौ.पूजा रमेश टेंभरे, सौ.इंद्रायणी मूनेश रहांगडाले, सौ.सीमा राहुल हरीनखेडे, सौ.शोभिका राजेन्द्र बिसेन, सौ.प्रीती हेमंत बघेले, सौ.लक्ष्मी नरेंद्र ठाकूर, सौ.कुंतन फुलिचंद पटले, सौ.प्रतिभा झुमकलाल रहांगडाले, सौ.कविता चौधरी, सौ.शितल छनेंद्र पटले, सौ.जानकी पारधी, सौ.रेखा राजेश बिसेन, सौ.ममता येळे, डॉ.त्रिवेणी घनश्याम बघेले, डॉ.अश्विनी मनोज कटरे, सौ.इंदू चंद्रप्रकाश पारधी यांचा समावेश करण्यात आला.

blank