तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यानी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नमिता त्रिपाठी यांची आज भेट घेवून रेल्वे विषयक समस्या तातडीने मार्गी लावण्याबाबत चर्चा करून पत्र दिले.यामध्ये प्रामुख्याने तिरोडा रेल्वे स्टेशनवर आझाद हिंद एक्स्प्रेस (12129/12130) , गोंडवाना एक्स्प्रेस,( 12409/12410 ) रिवा इतवारी एक्सप्रेस,( 11755 ) अप आणि डाऊन गाड्यांचा थांबा देण्यात यावा, तिरोडा स्टेशनवर, अपंग प्रवाश्याकरिता सरकता जिना लावणे, डीस्प्ले बोर्ड लावणे, तिरोडा धापेवाडा मार्गावर रेल्वे ओवरब्रिजचे काम सुरु असून सदर रस्त्याकरिता तिरोडा तहसील कार्यालय चिरेखनी वळण मार्ग दिल्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाहतूकीमुळे सदर रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. यापैकी तिरोडा रेल्वे स्टेशन ते संविधानचौक पर्यंत रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्ता रेल्वे विभागाअंतर्गत येत असल्यामुळे सदर रस्त्याचे मजबुतीकरण करण्याबतचे पत्र आमदारांनी दिले.त्याचबरोबर गोंदिया बल्लारशाह मार्गावरील हिरडामाली स्टेशनवर पटाखा गेट हलबीटोला येथे २.५ मिटरचे भुयारी पूल बांधकाम करण्याबाबतचे पत्र दिले असून यावर सर्व समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन रेल्वे महाप्रबंधक यांनी दिले.यावेळी प्रामुख्याने न.प. गोरेगावचे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार व नागरिक उपस्थित होते