डॉ. भारत लाडे यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले तरुणाचे प्राण

0
217

अर्जुनी मोर.– तालुक्यातील युवक कांग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत लाडे हे दैनंदिन अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील दौ-यावर असताना गोरेगाव येथे एका दुचाकी चालकाला टिप्परने धडक दिली,असता दुचाकी चालक ओमप्रकाश पारधी मु. पांढरी तालुका सडक/ अर्जुनी यांच्या डोक्याला जब्बर मार लागला व गंभीर रक्तस्त्राव होऊन बेशुद्ध पडला होता.मात्र या वेळेस डॉ. भारत लाडे यांनी प्रसंगावधान दाखवून लगेच ओमप्रकाश पारधी यांना ऑटो मध्ये टाकून ग्रामीण रूगणालय गोरेगाव येथे उपचारार्थ दाखल केले.डोक्याला गंभीर इजा असल्यामुळे पुढील उपचारासाठी के. टी. एस. जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे संदर्भित करण्यात आले. अपघात ग्रस्तांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल केल्यास त्यांचे प्राण वाचाविल्या जाऊ शकते. म्हणून अपघात ग्रस्तांची त्वरित मदत करावी असे आवाहन डॉ. भारत लाडे यांनी केले.