मौदा,दि.२९ः-सत्यशोधक समाज,ता.मौदाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक,मौदा येथे शिवराज्याभिषेक दिन (शाक्त पद्धतीने) व सत्यशोधक समाजाचा १५१ वा वर्धापन दिन महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्रीआई फुले यांना माल्यार्पण करून अभिवादन करून मोठ्या उत्साहात प्रबोधनात्मक साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जगदिश वाडिभस्मे यांनी सत्यशोधक समाज व महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल प्रकाश टाकला. म.फुलेंनी 1 जानेवारी 1848 ला वयाच्या 21 व्या वर्षी मुलींची पहिली शाळा सुरू केली. 1869 मध्ये शिवाजी महाराजांची समाधी शोधून 10 दिवसाची शिवजयंती उत्सव साजरा केला आणि शिवराज्याभिषेक दिनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.तसेच सत्यशोधक चळवळीमुळे छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, पंजाबराव देशमुख,संत गाडगेबाबा इ. महापुरुष घडलेत आणि आता सत्यशोधक समाजाचे कार्य विचारांच्या वारसांनी पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे, आणि वर्तमानात शिक्षण, बेरोजगारी,आरक्षण, कुपोषण,शेतकरी व विध्यार्थ्यांच्या आत्महत्या.हे आपल्या समोर आव्हान आहे असे मत वाडिभस्मे यांनी व्यक्त केले.
राजेंद्र पिसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसून त्यात मोठा भ्रष्टाचार करून तो पडण्यात आला व मोहन भागवत ज्या प्रकारे महात्मा फुलेंचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न करत आहे याचा त्यांनी निषेध व्यक्त केला.तर प्रदीप कांबळे व बालाजी कांबळे यांनी गीत सादर केले. याप्रसंगी ईश्वर डहाके यांनी संचालन करत सत्यशोधक समाजाबद्द्ल माहिती सुद्धा दिली.तर आभार हेमंत बरबटकर यांनी मानले.
याप्रसंगी प्रभाकर घंटा,भाऊराव धनजोडे,रमेश वाघाडे,मनोहर कापसे,ऍड.मृणाल तिघरे,सचिन तिघरे,मारोती हावरे,रमेश खोपे,प्रकाश घनकासार,अतुल फटींग,नामदेव ठोंबरे,सुधीर चवरे,प्रेम वैद्य,मनीष माटे,मंडल,रणबीर,मनीष रावत,अजित नगरकर,आशिष उके,शुभम गजभिये व मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि सत्यशोधक उपस्थित होते.