गोंदिया,दि.२९ः- ग्रामपंचायत सचिव म्हणून जिल्हा परिषद वर्ग तीन तांत्रिक वर्ग एक ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी हे ग्राम पंचायत सचिव म्हणून काम पाहत होते. मात्र गेली अनेक दिवसापासून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही पद एकत्र करून एकच पद निर्माण करण्याच शासनाच्या विचाराधीन होते.त्याप्रमाणे हे दोन्ही पदे रद्द करून त्याऐवजी ग्रामपंचायत अधिकारी हे पद शासनाने तयार केले आहे. त्या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा पारित करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता ग्रामपंचायत मध्ये सचिव म्हणून ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकारी दिसणार नाही.तर आता त्याऐवजी ग्रामपंचायत अधिकारी हे पद कार्यान्वित झालेले आहे. वास्तविक ग्रामपंचायतच्या विकासाच्या कणा म्हणून ग्रामपंचायतीच्या सचिवाला पाहिले जाते.त्यामुळे हे पद गावातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये महत्त्वाचे पद आहे. या पदाकडे आर्थिक अधिकार सह गावातील सर्वांगीण विकासासंदर्भात मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या पदाची गरिमा व प्रतिष्ठा सन्मानजनक व्हावी ह्या उद्देशाने शासनाने पदनाम बदल केलेला आहे.या दोन पदांना एकत्र करून एक पद निर्माण केल्यामुळे या संवर्गावर होणारे वेतन त्रुटी संदर्भातील अन्याय ही दूर झालेले आहे. आता ग्रामपंचायतीला ह्या पदनामामुळे अधिक सक्षम अधिकारी मिळाले असून त्यामुळे ग्राम विकासाचा डोलारा अधिक वेगाने चालेल अशी अपेक्षा केली जात आहे. त्यासोबत शासनाने ग्राम पंचायत सरपंच व उपसरपंच यांच्या ही मानधनात दुप्पट वाढ केली असून त्याचाही फायदा ग्राम पंचायत कामकाजात होणार असून सरपंच ही अधिक उत्साहाने काम करतील अशीही अपेक्षा केली जात आहे.
ग्रामसेवक व पदोन्नतीने ग्राम विकास अधिकारी झाल्यावर ही कामात बदल होत नव्हता.तसेच आर्थिक लाभ ही मिळत नव्हता.त्यामुळे वेतन त्रुटी निर्माण झाली होती.ग्रामसेवक s-8 मधून पहिली कालबद्ध पदोन्नती ग्राम विकास अधिकारी s-12 तर दूसरी विस्तार अधिकारी s-14 तर तिसरी सहायक गट विकास अधिकारी s-15 मिळायची.मात्र आता दोन पद एकत्र करून ग्रामपंचायत अधिकारी केल्यामुळे पहिली कालबद्ध विस्तार अधिकारी s-14 दूसरी कालबद्ध पदोन्नती सहायक गट विकास अधिकारी s-15 व तिसरी कालबद्ध पदोन्नती गट विकास अधिकारी s-20 असे मिळणार असल्यामुळे गेली अनेक वर्षापासून या संवर्गाची वेतन त्रुटी दूर झाली आहे. तसेच ग्राम पंचायतचा मुख्य अधिकारी म्हणून कामे करतांना ग्रामसेवक या पदनाम मुळे अडचण निर्माण व्हायची. आता ग्रामपंचायत अधिकारी पदनाम मुळे प्रशासकीय दृष्टीने पदाची गरिमा वाढली आहे. याकरिता गेली आठ वर्षे पासून शासनाकडे युनियन मार्फत मागणी व पाठपुरावा सुरू होता शासनाने ती मागणी मंजूर केल्यामुळे राज्यातील 22000 ग्राम पंचायत अधिकारी यांचे मार्फत आभार.
कमलेश बिसेन
जिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत अधिकारी युनियन