खानापूर,दि.२९ः-आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे विधानसभेसाठी रासपला सध्या कोणीही गृहीत धरू नये. जागावाटप झालेले नसल्याने वरिष्ठांनी सर्व जागा लढविण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार मतदारसंघ रासप लढणार असल्याची माहिती खानापुर तालुका अध्यक्ष प्रशांत खुपकर यांनी दिली.
पक्षाने महादेव जानकर यांच्या नेतृत्त्वाखाली आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सामान्यांना न्याय मिळवून सत्तेची कवाडे त्यांनी खुली केली आहेत. रासपचे अस्तित्त्व लक्षवेधी आहे. जानकर साहेबांवर आजही जिल्ह्यातील लोकांचे मोठे प्रेम असल्याचे सिद्ध झाले आहे. राज्यातील अन्य विधानसभा मतदारसंघाप्रमाणे या विधानसभा मतदारसंघातही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चाचपणी सुरू आहे. स्वबळावर या मतदारसंघातून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू असून जनमताचा कौल घेतला जात आहे. अनेक इच्छुकांनी रासपकडे उमेदवारीसाठी संपर्क साधला आहे.