40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home राजकीय विधानसभा निवडणुकीला घेऊन भाजयुमोच्या बैैठकीत चर्चा

विधानसभा निवडणुकीला घेऊन भाजयुमोच्या बैैठकीत चर्चा

0
154

गोंदिया,दि.०६ः– गोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मांडोदेवी येथे आगामी होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 लक्षात घेत भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया जिल्हा बैठक युवा मोर्चा प्रदेश सचिव चिंतामणि जोशी, जिल्हा अध्यक्ष येशुलाल उपराडे, युवा मोर्चा प्रभारी तिलक वैद्य यांच्या मार्गदर्शनात,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांच्या नेतृत्वात शनिवारला पार पडली.या बैठकीत आगामी निवड़णुकीची रणनीति, प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांचे योगदान कसे वाढवता येईल यावर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघत जनसम्पर्क मोहिम राबवून प्रत्येक घरापर्यंत शासनाने केलेल्या कामाची माहिती पोहचवणे.तसेच क्षेत्रतील तरुण मतदाराशी संवाद साधता येईल याच्यावर विचार करण्यात आला. युवा मोर्चाच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने भूमिका ठरविण्यात आली. भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांनी सर्वाना जोमाने तयारीला लागण्याच्या सुचना देऊन आगामी विधानसभेत युवा मोर्चा नक्कीच वरिष्ठच्या विश्वासावर खरी उतरेल असा विश्वास दिला. या बैठकीमुळे कार्यकर्त्तायांचा आत्मविश्वास वाढला असून आगामी निवड़णुकीसाठी संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्याची दिशा ठरवण्यात आली. तसेच युवा मोर्चा पदाधिकारी यांनी लोकसभेत झालेल्या चुकाना दुरुस्त करून विधानसभा निवड़णुककरिता ताकदीने कामाला लागण्याची सुचना दिली.