गोंदियातील ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाचे बुधवारला उदघाटन

0
793

गोंदिया,दि.०८: इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या मुला मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे बुधवार 9 आॅक्टोंबर राेजी नागपूर येथून दुपारी १.३० वाजता आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. गाेंदिया .येथील वस्तीगृहाचा उद्घाटन साेहळा गणेशनगर येथील संकल्प चाैक परिसरातील शासकीय वस्तीगृह इमारतीत आयोजित करण्यात आला आहे. आभासी पद्धतीने हाेणार्या या कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी असून   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस राहणार आहेत.विशेष म्हणजे या वसतिगृहाकरीता ओबीसी संघटना गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आंदोलन ,निवेदनाच्या माध्यमातून तसेच मंत्र्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा करीत होते,त्या पाठपुराव्याला आज यश आले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील विजाभजइमाव व विमाप्र प्रवर्गातील मुलांना व मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणे सोईचे व्हावे यासाठी विजाभजइमाव व विमाप्र प्रवर्गातील मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह सन 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे.

प्रमुख अतिथी म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, गाेंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून खासदार प्रफुल पटेल, खासदार डाॅ. प्रशांत पडाेळे, खा.नामदेवराव किरसान, विधान परिषद सदस्य डाॅ. परिणय फुके, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, तिराेडा-गाेरेगावचे आमदार विजय रहांगडाले, गाेंदियाचे आमदार विनाेद अग्रवाल, अर्जुनी मोरगावचे आमदार मनाेहर चंद्रीकापुरे, आमगाव-देवरीचे आमदार सहसराम काेराेटे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनीता सिंगल, इतर मागास बहुजन कल्याण   विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी, जिल्हाधिकारी प्रदीप नायर,मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगांनथम एम., पाेलीस अधीक्षक गोरख भामरे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थिंनी पालकांसह जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन इतर मागास  बहुजन कल्याण प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर व गाेंदियाचे सहाय्यक संचालक विनोद मोहतुरे यांनी केले आहे.