शासकीय धान्य गोदामे, स्वस्त धान्य दुकाने, शाळा, अंगणवाडी येथे भेटी देवून नियतन, उचल व वाटपाचा आढावा घ्यावा – राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत

0
30
परभणी, दि. 08 – : संबंधित विभाग प्रमुखांनी शासकीय धान्य गोदामे, स्वस्त धान्य दुकाने, शाळा, अंगणवाडी येथे भेटी देवून नियतन, उचल व वाटपाचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा, अशी सूचना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिली.
यावेळी राज्य अन्न आयोगाचे सचिव प. फ. गांगवे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, शिधा वाटप निरीक्षक बाजीराव तंवर, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) सुनिल पोलास, जिल्हा महिला व बालविकास अधिकिारी कैलास तिडके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विकास मुसळे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) विशाल जाधव, प्रांत अध्यक्ष ग्राहक पंचायत विलास मोरे, शिक्षण समिती प्रमुख देवगिरी प्रांत डॉ. संगीता आवचार उपस्थित होते.
राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागाच्या धान्य प्राप्त नियतन, उचल व वाटप, शासकीय धान्य गोदामे, स्वस्त धान्य दुकाने याबाबत आढावा घेतला. महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडून गरम ताजा आहार प्राप्त व वाटप केलेल्या नियतनाचा तपशील व घरपोच आहार प्राप्त व वाटप केलेल्या नियतनाचा तपशील या विषयी आढावा घेतला. शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, परभणी या विभागाकडून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना याबाबत आढावा घेवून संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटी देवून आढावा घेण्याबात सूचना दिल्या. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.